जवाहरलाल हायस्कुल मंगळवेढा येथे ‘माझं बालपण, माझा अधिकार’ अभियानांतर्गत विविध कायदेविषयक शिबिर संपन्न

जवाहरलाल हायस्कुल मंगळवेढा येथे ‘माझं बालपण, माझा अधिकार’ अभियानांतर्गत विविध कायदेविषयक शिबिर संपन्न
राष्ट्रीय प्राधिकरण नवी दिल्ली, व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव, अमोलकुमार देशपांडे यांचे सहकार्याने मंगळवेढा तालुका विधी सेवा समिती व मंगळवेढा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल शेतकी हायस्कुल, मंगळवेढा येथे सुरक्षित बचपन अभियानांतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी दुसरे सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस. एच. दमामे होते. न्यायाधीश एस. एच. दमामे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार, कायदेशीर मदत कशी घ्यायची, मोबाईलचा सुदपयोग कसा करावा, तसेच सायबर गुन्हयांपासुन कसे सतर्क रहावे या बाबत मार्गदर्शन करुन त्यांनी त्यांचे मनोगत व्यकत केले. ‘माझं बालपण, माझा अधिकार’ या संकल्पनेवर आधारित या शिबीरात विविध कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात ॲड. ए. ए. भिंगे यांनी ‘मेरा बचपन, मेरा अधिकार’ या विषयावर बालहक्क व बालसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. चाईल्ड लाईन सुपरवायजर, महिला व बाल विकास विभाग, सोलापूर अनोज कदम यांनी ‘कानून जानो, बचपन बचाओ’ या विषयातून पॉक्सो कायदा व कायदेशीर मदतीची माहिती दिली. तसेच १०९८ व ११२ या चाईल्ड हेल्पलाईनची माहिती दिली. सहा. पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर यांनी ‘सुरक्षित क्लिक, सुरक्षित बचपन’ या विषयावर इंटरनेट सुरक्षितता, सायबर गुन्हे व ऑनलाइन शोषण व अयोग्य फाेटो शेअर करण्याचे धोके याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. एस. ए. ढावरे यांनी ‘बोलो, बताओ, बचाओ’ या विषयातून सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, विश्वासु व्यक्तीकडे मदत मागणे व तक्रार प्रक्रियेची माहिती दिली, तर चाईल्ड लाईन सुपरवायजर, महिला व बाल विकास विभाग, सोलापूर स्वप्नील शेट्टी यांनी बालविवाह व बालशोषणाविरोधात जनजागृती करुन बालविवाह न करण्याची शपथ दिली. या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.राजु शेख, ॲड. इरफान सय्यद, ॲड. एस. आर. पवार, ॲड.विठठल क्षिरसागर, ॲड.गायत्री चव्हाण, ॲड.तरन्नुम मुजावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास हायस्कुलचे मुख्याध्यापक मिलींद कुलकर्णी, सहाय्यक शिक्षक सिध्देश्वर अवघडे, निकिता भगत, सुनंदा माने इ. शिक्षक व शिक्षकेतकर कर्मचारी साेमनाथ माळी वगैरे तसेच न्यायालयीन कर्मचारी बी. टी. कोष्टी, विधी स्वयंसेवक श्री प्रतिक भोसले व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष दुधाळ यांनी केले तर आभार नितीन मोरे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
