न.पा.मुला मुलींची शाळा नं. ५ साठे नगर, मंगळवेढा येथे ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत विविध कायदेविषयक शिबिर संपन्न

राष्ट्रीय प्राधिकरण नवी दिल्ली, व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव, अमोलकुमार देशपांडे यांचे सहकार्याने मंगळवेढा तालुका विधी सेवा समिती व मंगळवेढा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न.पा.मुला मुलींची शाळा नं. ५ साठे नगर, मंगळवेढा येथे सुरक्षित बचपन अभियानांतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालकांनी अतिशय छान पध्दतीने स्वागत गीताने सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. एस. माळी होत्या. न्यायाधीश एम. एस. माळी यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हावी, चांगला आणि वाईट स्पर्श ओळखता यावा तसेच कोणत्याही अडचणीच्या वेळी विश्वासू व्यक्तीला सांगण्याचे धैर्य मिळावे याबाबत मार्गदर्शन करुन त्यांनी त्यांचे मनोगत व्यकत केले. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता गौरी कुलकर्णी यांनी ‘माझं बालपण, माझा अधिकार’ या संकल्पनेवर आधारित लहान विद्यार्थ्यांना बालहक्क, बालसुरक्षा आणि सुरक्षिततेविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. बालकांना कोणकोणते अधिकार आहेत, बाल न्याय मंडळ म्हणजे काय, बाल शिक्षण कायदा इत्यादी माहिती देण्यात आली.

