शरद पवार विद्यालय, शरदनगर, ता. मंगळवेढा येथे सुरक्षीत बचपन अभियानांतर्गत
विविध कायदेविषयक शिबीर संपन्न….

मा. राष्ट्रीय प्राधिकरण नवी दिल्ली, व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष मा. जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सचिव अमोलकुमार देशपांडे यांचे सहकार्याने मंगळवेढा तालुका विधी सेवा समिती व मंगळवेढा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षीत बचपन अभियानाचे औचीत्य साधुन शरद पवार विद्यालय, शरदनगर, ता. मंगळवेढा येथे कायदेविषयक शिबीराचे अयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या अध्यक्ष्यस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्रीमती. व्ही. के. पाटील होते. समाजात समतेचा संदेश देणाऱ्या व मुलांमुलींच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात महत्त्वपूर्ण कायद्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. “जागरूकता, सुरक्षा आणि संरक्षण – हर बच्चे का अधिकार” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले: ॲड. जी. एस. बुरकुल – बालहक्क, बालसंरक्षण व कायदेशीर अधिकारांची माहिती दिली. तसेच बालकांना कोणकोणते अधिकार आहेत, बाल न्याय मंडळ म्हणजे काय, बाल शिक्षण कायदा इत्यादी माहिती देण्यात आली. श्री. नितीन थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (महिला व बालविकास विभाग) यांनी पोक्सो कायद्याची माहिती व कायदेशीर मदतबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी बाल अत्याचारांचे प्रकार किती व कोणकोणते, १०९८ या टोल फ्री चाईल्ड हेल्पलाईन नंबरची माहिती दिली. श्री. कुमार ढेरे (सहा. पोलीस निरीक्षक, मंगळवेढा पोलीस ठाणे) – इंटरनेट सुरक्षितता, सायबर गुन्हे, ऑनलाइन शोषण व अयोग्य फोटो शेअर करण्याचे धोके याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी ए.आय. टेक्नॉलॉजीचा सदुपयोग कसा करावा, अयोग्य फाेटो सोशल मिडीयावर शेअर केल्यास कोणकोणते दुष्परीणाम होतात याबददल सखोल मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती एस. आर. क्षिरसागर – सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, विश्वासू व्यक्तीकडे मदत मागणे व तक्रार प्रक्रिया बददल माहिती दिली. श्री. आनंद ढेपे, जिल्हा समन्वयक, सोलापूर (महिला व बालविकास विभाग) – यांनी बालविवाह व बालशोषणाविरुद्ध सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पुढे बाल विवाह म्हणजे काय, १०९८ टोल फ्री नंबर बालकांनी कधी वापरावा, कशासाठी वापरावा याबददल अत्यंत महत्वपुर्ण माहिती सांगीतली. तसेच सर्व कार्यक्रमा दरम्यान मुलांना बालविवाहाची शपथ देण्यात आली. दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्रीमती. वृषाली पाटील यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम बददल महत्वपुर्ण माहिती दिली. त्यांनी बालकांचे संरक्षण, त्यांचे कायदेशीर अधिकार आणि त्यांच्या तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कायद्याचे मूलभूत ज्ञान, त्यांच्या हक्कांची जाणीव आणि आत्मसुरक्षेबाबत आत्मविश्वास मिळवून देण्याचा सकारात्मक प्रयत्न झाला. सायबर क्राइम आणि मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावरही विशेष मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना सतर्कतेचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, “मोबाईलचा अतिरेक टाळावा आणि सोशल मीडियावर सतर्क राहावे, कारण सायबर गुन्हे हळूहळू वाढत आहेत.” या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये कायद्याचे प्राथमिक ज्ञान, स्वतःचे हक्क, आत्मसुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेची जाणीव निर्माण केली. तसेच विविध प्रकारच्या नालसा योजनेबददल मार्गदर्शन केले व कायदेशीर मदत सेवा हेल्पलाईन नंबर १५०० बददल माहिती दिली. सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, विधीज्ञ संघ मंगळवेढा चे अध्यक्ष,ॲड. आर. आय. शेख,सचिव, ॲड.एस.एस.टाकणे, ॲड. इरफान सय्यद, ॲड. संगम मोरे, ॲड. संतोष मस्के उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे सचिव श्री. बळवंत पाटील, अध्यक्ष श्री. प्रथमेश पाटील, प्राचार्य श्री. पी. एम. माने, केंद्र प्रमुख श्री. दत्तात्रय कारंडे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतकर कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी श्री. एस. बी. जगताप, श्रीमती. आर.जे.सांगोलकर, श्रीमती. व्ही.एस कासे-घंटे, विधी स्वयंसेवक श्री प्रतिक भोसले, पोलीस कर्मचारी आण्णासाहेब बाबर देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी. एम. रायबान सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे प्रचार्य श्री. पी. एम. माने यांनी मानले. सदरचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
