शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व IAS अधिकारी मा. रमेश घोलप यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद

मंगळवेढा नगरपालिका मुलां-मुलींची शाळा क्र. ५ येथील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तसेच IAS अधिकारी मा. रमेश घोलप (भा.प्र.से.) यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद कार्यक्रम रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
📍 स्थळ: श्रीराम पॅलेस, शिशु विहार समोर, मंगळवेढा
शुभहस्ते:
मा. रमेश घोलप (भा.प्र.से.)
आयुक्त, सिव्हील डिफेन्स; विशेष सचिव रँक, गृह विभाग, झारखंड
अध्यक्ष:
मा. समाधान (दादा) आवताडे
आमदार, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
प्रमुख अतिथी:
सौ. सुनंदाताई आवताडे – नगराध्यक्षा, न.पा. मंगळवेढा
मा. येताळा भगत – उपनगराध्यक्ष, न.पा. मंगळवेढा
मा. सोमनाथ आवताडे – शिक्षण सभापती, न.पा. मंगळवेढा
मा. अजित जगताप – नगरसेवक, न.पा. मंगळवेढा
मा. बिभिषण रणदिवे – प्रशासनाधिकारी, न.पा. शिक्षण मंडळ
आपले स्नेहांकित:
मार्गदर्शक शिक्षक श्री. विशाल विलास गायकवाड व समस्त विद्यार्थी – पालकवृंद, न.पा. मुलां-मुलींची शाळा क्र. ५, मंगळवेढा
“असाध्य ते साध्य करिता सायास” – प्रयत्नांनी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते, हाच संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा देईल. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
