पी.एम.श्री.न.पा. मुलांची शाळा नं. २ मंगळवेढा येथे ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत विविध कायदेविषयक शिबिर संपन्न

पी.एम.श्री.न.पा. मुलांची शाळा नं. २ मंगळवेढा येथे ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत विविध कायदेविषयक शिबिर संपन्न
राष्ट्रीय प्राधिकरण नवी दिल्ली, व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव, अमोलकुमार देशपांडे यांचे सहकार्याने मंगळवेढा तालुका विधी सेवा समिती व मंगळवेढा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.श्री.न.पा.मुलांची शाळा नं.२, मंगळवेढा येथे सुरक्षित बचपन अभियानांतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी दुसरे सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस. एच. दमामे होते व त्यांनी मुलांना लहान वयातच स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हावी, चांगला आणि वाईट स्पर्श ओळखता यावा तसेच कोणत्याही अडचणीच्या वेळी विश्वासू व्यक्तीला सांगण्याचे धैर्य मिळावे याबाबत मार्गदर्शन करुन त्यांनी त्यांचे मनोगत व्यकत केले. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता नेत्रजा पाटील यांनी ‘माझं बालपण, माझा अधिकार’ या संकल्पनेवर आधारित लहान विद्यार्थ्यांना बालहक्क, बालसुरक्षा आणि सुरक्षिततेविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, बालकांना कोणकोणते अधिकार आहेत, बाल न्याय मंडळ म्हणजे काय, बाल शिक्षण कायदा इत्यादी माहिती देण्यात आली. ॲड. महादेव गायकवाड यांनी ‘मेरा बचपन, मेरा अधिकार’ या विषयावर बालहक्क व बालसंरक्षणाबाबत मुलांना समजेल असे मार्गदर्शन केले. महिला व बाल विकास विभाग, सोलापूर सुपरवाजर वैशाली बाळशंकर यांनी ‘कानून जानो, बचपन बचाओ’ या विषयातून पॉक्सो कायदा व कायदेशीर मदतीची माहिती दिली. तसेच १०९८ व ११२ या चाईल्ड हेल्पलाईनची माहिती दिली. पोलीस उप निरीक्षक विजय पिसे यांनी ‘सुरक्षित क्लिक, सुरक्षित बचपन’ या विषयावर इंटरनेट सुरक्षितता, सायबर गुन्हे व ऑनलाइन शोषण व अयोग्य फाेटो शेअर करण्याचे धोके याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. श्वेता वांढरे यांनी ‘बोलो, बताओ, बचाओ’ या विषयातून सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, विश्वासु व्यक्तीकडे मदत मागणे व तक्रार प्रक्रियेची माहिती दिली, तर महिला व बाल विकास विभाग, सोलापूर सुपरवाजरअक्षता जाधव यांनी बालविवाह व बालशोषणाविरोधात जनजागृती करुन बालविवाह न करण्याची शपथ दिली. या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.राजु शेख, विधीज्ञ संघाचे खजीनदार ॲड. सागर टाकणे, ॲड. प्रथमेश दत्तु, ॲड. सीमा ढावरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार मांजरे, सह शिक्षक सुनिल शिंदे, संगीता जावीर, उत्तम ढगे, शुभांगी जोशी, रिजवाना काझी, चंद्रकांत देसाई, उज्ज्वला खंदारे, स्वप्नील लाळे व शाळा सहाय्यक प्रशिक ढावरे हजर होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी बी. टी. कोष्टी, विधी स्वयंसेवक प्रतिक भोसले देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सुनिल शिंदे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राजकुमार मांजरे यांनी मानले.
